पीसीबीची आशिया कपमधून मॅच रेफरी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी
अबूधाबी, 15 सप्टेंबर (हिं.स.) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुबईमध्ये भारताविरुद्ध झालेल्या ग्रुप अ सामन्याच्या एक दिवसानंतर आशिया कप २०२५ मधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भार
अँडी प्रायकॉफ्ट


अबूधाबी, 15 सप्टेंबर (हिं.स.) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुबईमध्ये भारताविरुद्ध झालेल्या ग्रुप अ सामन्याच्या एक दिवसानंतर आशिया कप २०२५ मधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटपटूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानने सामन्यानंतर पंचांकडे अधिकृत निषेध नोंदवला. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, पीसीबीने आयसीसीच्या आचारसंहिता आणि क्रिकेटच्या भावनेशी संबंधित एमसीसीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने आशिया कपमधून मॅच रेफरींना तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर झिम्बाब्वेच्या अँडी पायक्रॉफ्टने या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्याने पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पीसीबीने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, संघ व्यवस्थापक नवीद चीमा यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या हस्तांदोलन न करण्याच्या वर्तनाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला आहे. हे खेळाच्या भावनेविरुद्ध आणि खेळासाठी अयोग्य मानले गेले. निषेध म्हणून, आम्ही आमच्या कर्णधाराला सामन्यानंतरच्या समारंभाला पाठवले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande