लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदेड येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन तायक्वांडो महिलांच्या स्पर्धेत कु सुवर्णा जवळे एम. कॉम. द्वितीय वर्ष या खेळाडूने 62 किलोग्राम वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.आपल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अनुभवावर तिने हे यश संपादन केले.
तिने मागील तीन वर्षा पासून अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. तसेच कु अनुजा बिरादार एम.एस्सी. प्रथम वर्ष ह्या खेळाडूनी 67 किलो ग्राम वजन गटात रजत पदक प्राप्त केले आहे.
तसेच लातूर येथे संपन्न झालेल्या आंतर विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन पुरुषांच्या स्पर्धेत मादळे रितेश, बी कॉम तृतीय वर्ष च्या खेळाडूने आंतर विभागीय स्पर्धेत ब विभागाचे प्रतिनिधीत्व करत तृतीय क्रमांक पटकवून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले.
खेळ आणि खेळाडूसाठी प्रसिध्द असलेल्या या महाविद्यालयातून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. यशाची ही परंपरा कायम ठेवत खेळाडू आपली उज्ज्वल कामगिरी करत आहेत.
खेळाडूच्या या यशाबद्दल खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर , उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, व इतर कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.पी.गिरी, शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. नेहाल खान व प्रा.गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis