कोलकाता, 15 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी कोलकाता येथील लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय विजय दुर्ग येथे भारतीय सशस्त्र दलांच्या तीन दिवसीय १६ व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचे (सीसीसी) उद्घाटन केले.15 ते 17 सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या या महत्वाच्या परिषदेत देशभरातून तीनही सैन्यदलांचे कोर कमांडर्स एकत्र येऊन सुरक्षा, भविष्यातील रणनीती आणि लष्करी तयारीसंबंधित विविध विषयांवर तीन दिवस सखोल चर्चासत्र करतील.
उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र बलांनी दाखवलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. या प्रसंगी, पंतप्रधानांनी 'भारतीय सशस्त्र दल व्हिजन २०४७' दस्तऐवजाचे अनावरण केले, ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज भारतीय सशस्त्र दलांचा मार्ग मोकळा झाला, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने कोलकाता येथे जारी केलेल्या एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.यावेळी पंतप्रधान मोदी उद्घाटन सत्रात सकाळपासून सुमारे साडेतीन तासांपेक्षा अधिक वेळ पूर्व कमान मुख्यालयात वरिष्ठ लष्करी कमांडर्ससोबत उपस्थित होते.
ही परिषद सशस्त्र दलांसाठी सर्वोच्च विचारमंथन मंच आहे, जी देशातील वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्वाला वैचारिक व धोरणात्मक पातळीवर संवाद साधण्याची एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करते. निवेदनात सांगितले गेले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या वर्षाच्या संयुक्त कमांडर परिषदेत भारतीय सशस्त्र दलांमध्ये परिवर्तनशील सुधारणा आणि ऑपरेशनल तयारी यावर विशेष भर दिला जात आहे. यावर्षीचा विषय आहे – “सुधारणांचे वर्ष – भविष्यासाठी परिवर्तन”.
या परिषदेत लष्कराचे आधुनिकीकरण, संयुक्तता व एकत्रिकरण, तसेच बहु-क्षेत्रीय युद्धासाठीची तत्परता वाढवण्यासह अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा केली जात आहे. या संयुक्त परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, प्रमुख संरक्षण अध्यक्ष जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, तसेच सेना, वायुदल व नौदलाचे प्रमुख आणि वरिष्ठ लष्करी कमांडर्स सहभागी झाले आहेत.ही संयुक्त कमांडर परिषद दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. मागील परिषद 2023 मध्ये भोपाल येथे झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode