चंदीगड, 15 सप्टेंबर (हिं.स.) भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना चंदीगड येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने ३५ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट्सने मोठा विजय मिळवला. पण अनुभवी फलंदाज स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी खेळून या सामन्या एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ५०हून अधिक धावा करणारी ती जगातील संयुक्त पाचवी फलंदाज बनली आहे. विशेष म्हणजे तिने दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटपटू लॉरा वोल्वार्डची बरोबरी केली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्यानंतर मानधनाच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे.
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजचे नाव आघाडीवर आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७१ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्यानंतर चार्लोट एडवर्ड्सचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. एकदिवसीय स्वरूपात ५५ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारी ती क्रिकेटपटू आहे.. सुझी बेट्स आणि स्टेफनी टेलरचे नाव अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बेट्सने ५० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या दिग्गज महिला क्रिकेटपटूंनंतर मानधना आणि वोल्वार्ड पाचव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही स्टार महिला क्रिकेटपटूंनी प्रत्येकी ५० पेक्षा जास्त ४३ वेळा धावा केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे