सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। हरिभाई देवकरण व वालचंदचे माजी विद्यार्थी अभियंता उदय खांबेटे यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात यश मिळवत चांद्रयान मोहिमेत देखील खारीचा वाटा उचलला आहे. या प्रकारच्या मोहिमेत सहभागी होणारे ते सोलापूरचे पहिले अभियंता ठरले आहेत.
उदय खांबेटे हे मुळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांनी त्यांचे शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत पूर्ण केले. तर डब्ल्यूआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी पदवी अभियांत्रिकीसाठी इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड घेऊन ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातून व्हीएलएसआय डिझाईन या विषयात शिक्षण घेतले. पुणे व इंदोरमध्ये काही वर्ष खासगी नोकरी केली. नंतर सेमीकंडक्टर क्षेत्रात नंतर कार्यास सुरवात केली. डिझाईन अँड अॅप्लिकेशन स्पेसीफिक इंटिग्रेटेड सर्किटस मध्ये संशोधन केले. १६, ३२ व ६४ बीट मायक्रोप्रोसेसरच्या डिझाईनचे काम केले. त्यानंतर त्यांनी चांद्रयान मोहीम दोन, तीन व आदित्य एलएम या अवकाश मोहिमांमध्ये त्यांचे योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड