आ.आमश्या पाडवी यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
नंदुरबार, 16 सप्टेंबर (हिं.स.) एका माथेफिरुने व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांना नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आदिवासी स
आ.आमश्या पाडवी यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी


नंदुरबार, 16 सप्टेंबर (हिं.स.) एका माथेफिरुने व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांना नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बिरसा क्रांती दलातर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील धनगर व बंजारा समाजातील काही तथाकथित मंडळी ही धनगर व बंजारा समाजाला आदिवासी समाजात आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्या, अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींनी आमदार आमश्या पाडवी यांना आरक्षणाबाबत त्यांची भुमिका विचारली. त्यावर सरकारने आदिवासी समाजात इतर समाजाला आरक्षण देऊ नये व दिल्यास सरकार मधुन बाहेर पडेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. आ. पाडवी यांच्या वक्तव्याचा राग आणि द्वेष मनात धरुन महाराष्ट्रातील घनश्याम बापू नावाचा एका माथेफिरुने एका व्हिडिओच्या माध्यमातून आ. आमश्या पाडवी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ केली आहे. आम्ही आदिवासी समाज बांधव सदर माथेफिरुचा जाहीर निषेध करीत आहोत. या व्यक्तीने हेतु पुरस्कर आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात विखारी वक्तव्य करीत आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण खराब करु इच्छिणार्‍या प्रवृत्ती व अशा व्यक्तीवर तात्काळ जातीवाचक तसेच आमदार आमश्या पाडवी यांचे नावाविषयी अपशब्द वापरला आहे. म्हणून ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande