परभणीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। वीर सावरकर विचार मंचच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त
परभणीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। वीर सावरकर विचार मंचच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विलासराव देशपांडे हे होते. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी वीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष मधुकरराव गव्हाणे, डॉ. नवीनचंद्र मोरे, अँड. रमेशराव दुधाटे गोळेगावकर, विजय अग्रवाल, राजेश देशपांडे, भगवान देसाई, संजय रिझवानी, ज्ञानोबा मुंडे, शिवराज नाईक, अनुप शिरडकर, संतोष पवार, विनायक पिसाळ, टी. एम. कुलकर्णी व बळवंतराव खळेकर आदींसहीत वीर सावरकर विचार मंचच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतापराव देशपांडे तर सूत्रसंचालन विनोद डावरे यांनी केले.

पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असून यावेळी प्रा. संतोष शेलार यांचे व्याख्यान होणार आहे. बक्षिस वितरण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावरकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande