चंद्रपूर : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत भूमि अभिलेख कार्यालय तर्फे ‘सेवा पंधरवडा’
चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर) या कालावधीत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उपअ
चंद्रपूर : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत भूमि अभिलेख कार्यालय तर्फे ‘सेवा पंधरवडा’


चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर) या कालावधीत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने उपअधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडून जनतेला देण्यात येणाऱ्या विविध सेवांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात फेरफार अदालत 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढून अर्जदारांना आवश्यक फेरफार सनद देण्यात येईल. स्वामित्व योजना सनद वाटप शिबिर 18 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल. मोजणी अदालत 22 सप्टेंबर रोजी होणार असून अर्जदारांकडून जास्तीत जास्त मोजणी अर्ज स्वीकारले जाऊन मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन केले जाईल.जनता दरबार 23 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. स्वामित्व योजना तक्रार निवारण अदालत 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर कालावधीत चंद्रपूर तालुक्यातील नागरिकांनी या सेवा पंधरवड्यात आयोजित विविध उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उप अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande