चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यामध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
दिव्यांग कल्याण विभागाचे प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील कामकाज सद्यस्थितीत सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हास्तरावरील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत हाताळण्यात येत आहे.
दिव्यांगाचे कल्याण, शिक्षण, सक्षमीकरण आणि समावेशनासाठी असलेल्या शासकीय योजना, कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे दिव्यांग कल्याण विभागाचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत दिव्यांग व्यक्तींना त्याच्या समस्यांसाठी विभागाचे जिल्हा कार्यालय सुरू नसल्याने माहिती आणि सेवा मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, समाज कल्याण विभाग कार्यालय, तळमजला, चंद्रपूर येथे सुरू केले असून या कार्यालयाच्या पत्यावर पत्र व्यवहार करण्यात यावा. तसेच कार्यालयाचा ई-मेल आयडी- ddeochandrapur@gmail.com. असून यावर ई-मेल करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव