चंद्रपूर : रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। रब्बी हंगामासाठी अन्नधान्य पिके, पौष्टीक तृणधान्य आणि तेलबिया पिकांअंतर्गत पिके प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. राष्ट
चंद्रपूर : रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। रब्बी हंगामासाठी अन्नधान्य पिके, पौष्टीक तृणधान्य आणि तेलबिया पिकांअंतर्गत पिके प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (अन्नधान्य पिके), राष्ट्रीय कृषि विकास योजना, पौष्टीक तृणधान्य अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया पिके) अंतर्गत रब्बी हंगामात कडधान्य, पौष्टिक तृणधान्य आणि करडई या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या बाबी अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande