चंद्रपूर : तहसील कार्यालयाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन
चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये चंद्रपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आह
चंद्रपूर : तहसील कार्यालयाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन


चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये चंद्रपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीने पहिल्या टप्प्याचे नियोजन (17 ते 22 सप्टेंबर) करण्यात आले आहे.

या अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील सर्व गाव रस्ते, शेत रस्ते, पाणंद / शिवरस्ते व इतर रस्ते यांची शिवार फेरी घेऊन सर्वेक्षणनुसार रस्त्याची माहिती तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल. सर्वेक्षणनुसार तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची यादी ग्रामसभेमध्ये ठेवून त्यास ग्रामसभेची मान्यता व रस्त्याची नोंद घेण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात येत आहे. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख, चंद्रपूर यांच्याकडून रस्त्याची मोजणी व सीमा निश्चित करून नकाशामध्ये नोंद व संबंधित शेतकरी यांच्या 7/12 चे इतर अधिकारात नोंद घेण्यात येत आहे. अतिक्रमण असलेल्या रस्त्यासाठी रस्ता अदालत आयोजन करून अतिक्रमण निस्कासित करण्यात येत आहे. 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र ' योजना अंतर्गत पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहे.

दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर) : दुस-या टप्यात सर्वासाठी घरे या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांच्यामार्फत गावातील घरकुल लाभार्थी, यांचा शोध घेऊन ज्यांना मालकीची जागा नाही व ज्यांचे शासकीय जागेवर किंवा खाजगी जागेवर अतिक्रमण करून ताबा केला आहे, अशा घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन पट्टे वाटप, (नियमाकूल) करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) : महाराजस्व अभियानातंर्गत तिस-या टप्प्यात नागरीकांच्या स्थानिक गरजा लक्षात घेवुन विविध प्रमाणपत्राचे वाटप, सातबाराचे वितरण, अर्धन्यायीक महसुल प्रकरणाकरीता महसुल अदालतीचे आयोजन, जिवंत सातबारा मोहिम, इत्यादी नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यांत येणार आहेत.सेवा पंधरवड्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार व तहसिलदार विजय पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande