भारत आता चर्चा करण्याच्या टेबलावर येत आहे - पीटर नवारो
वॉशिंग्टन, 16 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारत आणि टॅरिफ संदर्भात वक्तव्य केलं. नवारो यांनी दावा केला की, भारत आता चर्चा करण्याच्या टेबला
पीटर नवारो


वॉशिंग्टन, 16 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारत आणि टॅरिफ संदर्भात वक्तव्य केलं. नवारो यांनी दावा केला की, भारत आता चर्चा करण्याच्या टेबलावर येत आहे. पुढे त्यांनी पुन्हा एकदा भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या तेलाचा मुद्दा उपस्थित केला आणि भारत-चीन युतीची टीका केली.

नवारो म्हणाले, “भारत चर्चेच्या टेबलावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत सौहार्दपूर्ण, चांगलं आणि रचनात्मक ट्वीट केलं आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्याला उत्तर दिलं. आता पाहूया की हे कसं पुढे जातं. दोन्ही देश अजूनही व्यापाराच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत आणि ‘व्यापार अडथळ्यांवर’ काम करत आहेत. पण वास्तवात पाहिलं, तर आम्हाला माहिती आहे की व्यापाराच्या बाबतीत, त्यांचे टॅरिफ्स कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. त्यांच्या गैर-टॅरिफ अडथळ्यांचा स्तरही खूपच जास्त आहे. आम्हाला याचा सामना करावा लागतो, जसं की इतर देशांशी करतो जे असंच करतात.”

नवारो यांनी 2022 नंतर भारताने रशियन तेल खरेदी केल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने अचानक चिंता का व्यक्त केली, यावर भाष्य करताना ते म्हणाले, “भारताने रशियन तेल खरेदी केल्याचा मुद्दा सुद्धा आहे, जो त्यांनी यापूर्वी कधीच केला नव्हता. तुम्ही हे समजू शकता. 2022 च्या आधी त्यांनी असं कधी केलं नव्हतं. माझा अर्थ असा आहे की, आक्रमणाच्या ताबडतोब नंतर भारतीय रिफायनरी कंपन्या रशियन रिफायनर्यांशी एकत्र आल्या आणि त्यांनी चोरट्यांसारखं वागायला सुरुवात केली. हे अगदी वेडसर आहे. कारण ते अन्यायकारक व्यापारातून आम्हाला गंडवत आहेत आणि नफा कमवत आहेत.” “यामुळे काय होतं? मग अमेरिकन कामगार अडचणीत येतात, बरोबर ना?”

नवारो यांनी रशिया आणि चीनसोबत भारताच्या कथित जवळीकवरही टीका केली आणि म्हणाले,“मग भारत त्याच पैशाचा वापर रशियन तेल खरेदीसाठी करतो, आणि मग रशिया त्याच पैशातून शस्त्रास्त्र खरेदी करतो. आणि शेवटी आम्हालाच म्हणजेच अमेरिकन करदात्यांना युक्रेनच्या संरक्षणासाठी अधिक पैसे भरावे लागतात. हे कसं योग्य ठरू शकतं?”

“मोदींना चीनसोबत एका व्यासपीठावर पाहणं जो देश भारतासाठी दीर्घकालीन अस्तित्वाचा धोका मानला जातो आणि पुतिनसोबतही, हे एक खूपच गुंतागुंतीचं होतं. मला नाही वाटत की मोदींना असं करणं फारसं सोयीचं वाटलं असेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande