नांदेडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त
नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)।कंधार महसूल विभागाची कारवाई झाली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त करण्यात आला आहे फुलवळ – कंधार महसूल विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा (MH 26 BH 0011) तीन ब्रास वाळूसह जप्त केला. या कारव
अ


नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)।कंधार महसूल विभागाची कारवाई झाली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त करण्यात आला आहे फुलवळ – कंधार महसूल विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा (MH 26 BH 0011) तीन ब्रास वाळूसह जप्त केला. या कारवाईनंतर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नायब तहसीलदार रेखा चामनर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हरबळ परिसरात ही कारवाई केली. पथकात मंडळ अधिकारी एस. आर. शेख, ग्राम महसूल अधिकारी बालाजी केंद्रे, शिपाई शिवराज लघुळे, वाहन चालक मिर्झा समीर बेग व दफेदार ज्ञानेश्वर राखे यांचा समावेश होता.

सदर हायवा लोहा तालुक्यातील पेनुर गावातील नवनाथ मारुती गवते यांच्या मालकीचा असून तो बेटसांगवी येथून वाळू घेऊन जळकोट जांब येथे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईचे सामान्य नागरिक व घरकुल लाभधारकांकडून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande