सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.) बीडमधील जिल्ह्यातील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. पोलिसांनी तिच्या बँक खात्यात किती पैसे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे. आज शनिवारी तीन दिवसांची पोलिस कोठडीत संपल्यानंतर पूजा गायकवाडला बार्शी तालुका न्यायालयात हजर करण्यात आलं. वैराग पोलिसांनी पूजाच्या बँक खात्याची चौकशी करावयाची आहे, त्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी कोर्टात केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पूजा गायकवाड हिला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आणखी २ दिवस पोलीस कोठडीत मुक्काम वाढल्याने पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ झाली आहे.गोविंद बर्गे यांना दबावात आणल्यामुळे आत्महत्या केल्याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड