परदेशी तरुणीवर गोव्यात अत्याचार; सोलापुरातून 28 वर्षीय डॉक्टरला अटक
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. पीडित 24 वर्षीय तरुण मूळ मोरोक्को देशाची रहिवासी आहे, तर वृषभ दोशी असे 28 वर्षीय आरोपी डॉक्टरचे नाव आहे. उपचारांसाठी ती गोव्यातील एका खाजगी
परदेशी तरुणीवर गोव्यात अत्याचार; सोलापुरातून 28 वर्षीय डॉक्टरला अटक


सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. पीडित 24 वर्षीय तरुण मूळ मोरोक्को देशाची रहिवासी आहे, तर वृषभ दोशी असे 28 वर्षीय आरोपी डॉक्टरचे नाव आहे. उपचारांसाठी ती गोव्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी ती आयसीयूमध्ये असताना वृषभने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुरुवारी पोलिसांनी वृषभला सोलापूर येथून अटक केली. वृषभ दोशी मूळ सोलापूरचा आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या आरोपानुसार ती काही जणांसोबत NGO च्या एका ट्रेनिंग प्रोग्रामसाठी बिझनेस व्हिसावर गोव्यात आली होती. हे NGO दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी काम करते. ट्रेनिंग दिवर बेटावर होते. ती दिवरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबली होती. तिथे तिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला जुन्या गोव्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande