परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर, ज्येष्ठ नेते मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर, माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, संघटनमंत्री संजय कौडगे, प्रेरणा वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त विश्वहिंदू परिषदेचे महाराष्ट्र–गोवा क्षेत्रीय सहमंत्री अनंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण– एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूल, खंडोबा बाजार, स्वच्छता मोहीम – स्मशानभूमी, खंडोबा बाजार, फळवाटप – जिल्हा नेत्ररुग्णालय, शनिवार बाजार येथे उपक्रम पार पडणार आहेत. भाजपाच्या वतीने सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सुजाण नागरिक, युवक व महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis