शी बॉक्स पोर्टल वर खाजगी आस्थापनांची नोंदणी बंधनकारक
पालघर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अध
SHE BOX PORTAL वर खाजगी आस्थापनांची नोंदणी बंधनकारक


पालघर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, स्थानिक तक्रार निवारण समिती पालघर विवेक चौधरी यांनी केले आहे.

पॉश कायदा २०१३ मधील कलम ४ नुसार, ज्या कार्यालया/आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee – ICC) स्थापन करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने अशा सर्व समित्यांची नोंदणी शी बॉक्स पोर्टल वर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नोंदणीची प्रक्रिया सोपी असून, संबंधित आस्थापनांनी http://shebox.wed.gov.in या संकेतस्थळावर जाऊन, “Private Head Office Registration” या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून Submit वर क्लिक केल्यास अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पूर्ण होते.

जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी या प्रक्रियेनुसार तक्रार समितीची नोंदणी पूर्ण करून पॉश कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्व आस्थापनांची जबाबदारी असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande