अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.)गेल्या दोन महिन्यांपासून बुलढाण्यातील कुख्यात घरफोडी करणारी टोळी तालुक्यात सक्रिय होती. टोळी कडून दिवसाढवळ्या बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या केल्या जात होत्या टोळीने अनेक चोऱ्या केल्या असल्याने गुप्त माहीतीच्या आधारे अंजनगाव पोलीस स्टेशन अधीकाऱ्यांनी शहरातील घरफोडीत सक्रीय अंसनारा बुलढाण्यातील एका कुख्यात घरफोड्यास अटक केली आहे.९ सप्टेंबर ला भर दिवसा सकाळी ११ वाजता. अंजनगाव शहरातील आशा नगर स्वप्ननगरी येथील दोन बंद घरांमधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले. महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३०५,३३१(१) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, ज्याची गंभीर दखल अंजनगाव पोलिसांनी घेतली आणि तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे अंजनगाव पोलिस आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा बुलढाणा येथे पोहोचल्यानंतर शकील डॉन टोळीचा कुख्यात घरफोडी करणारा शेख अहमद शेख समद, ( ३६ वर्ष) याला अटक करण्यात यश आले असुन टोळीचा मुख्य सूत्रधार शकील डॉन फरार आहे, ज्याचा अंजनगाव पोलिस सक्रियपणे शोध घेत आहेत. न्यायालयाने आरोपींला १६ सप्टेंबरपर्यंत पीसीआर दिला. सदर आरोपी मार्फत जिल्हाभरात केलेल्या चो़ऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. अंजनगाव पोलिसांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे, पोलिस अधिकारी सूरज बोंडे आणि उपपोलीस अधिकारी सूरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत चिर्डे तपास करत आहेत. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी