नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,एकनाथ शिंदे,लोहा-कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा टाकळगाव तालुका लोहा येथे भाजपाच्या नेत्या प्रणिता चिखलीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज होण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान आणि लोकसहभागातून 100 दिवसाच्या आणि 100 मार्कांच्या ग्राम समृद्धीच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या गावाचा शाश्वत विकास साधण्याकरिता लोहा कंधार तालुक्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन समृद्ध महाराष्ट्र होण्यासाठी समृद्ध गाव होणे गरजेचे आहे.याकरिता सरपंच,उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी अंगणवाडीच्या ताई,आशा वर्कर,बचत गटातील सर्व सदस्या,ग्रामस्थांनी या अभियानात अग्रणी पुढाकार घ्यावा अश्या भावना व्यक्त केल्या आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे,सरपंच सौ.कमलबाई लामदाडे,तंटामुक्ती आध्यक्ष शंकरराव मोरे,चेअरमन शिवाजीराव मोरे,उपसरपंच संभाजी चिंचोरे, काशिनाथ मामा लामदाडे,भीमराव लामदाडे,मुख्याध्यापक काशिनाथ कांबळे यांच्यासह मोठया संख्यने गावकरी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis