भारताने नाकारला होता अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव - पाकिस्तान परराष्ट्र मंत्री
इस्लामाबाद , 17 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. डार यांनी स्वीकारले आहे की, भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तान आणि भारतामधील कोणत्याही प्रश्नांमध्ये तिसऱ्या पक्षाच्या
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार


इस्लामाबाद , 17 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. डार यांनी स्वीकारले आहे की, भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तान आणि भारतामधील कोणत्याही प्रश्नांमध्ये तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला कधीच संमती दिली नव्हती. त्यामुळेच त्यांनी माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा फेटाळून लावला, ज्यामध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते की त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला पाकिस्तानसोबत मध्यस्थी करण्यास सांगितले होते.

डार यांनी पुढे सांगितले की, जेव्हा इस्लामाबादने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या समोर ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्याचा उल्लेख केला, तेव्हा अमेरिकेच्या वरिष्ठ राजनयिकांनी स्पष्ट केले की भारत नेहमीच म्हणतो की पाकिस्तानसोबतचे सर्व मुद्दे “पूर्णतः द्विपक्षीय” आहेत आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही.

डार म्हणाले, “आम्हाला तिसऱ्या पक्षाच्या सहभागाविषयी काहीही आक्षेप नाही, परंतु भारत स्पष्टपणे सांगतो आहे की हा एक द्विपक्षीय मुद्दा आहे. आम्हाला द्विपक्षीय चर्चेवर काही हरकत नाही, पण ती चर्चा व्यापक असली पाहिजे – दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था, जम्मू-काश्मीर, असे सर्व विषय ज्यावर आपण यापूर्वी चर्चा केली आहे.”

डार यांनी पुढे सांगितले की मे महिन्यात अमेरिकाने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता आणि सुचवले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा एका तटस्थ ठिकाणी होईल. परंतु २५ जुलैला वॉशिंग्टनमध्ये मार्को रुबिओंसोबत झालेल्या बैठकीत, डार यांना सांगण्यात आले की भारत या प्रस्तावाशी सहमत नाही.

डार म्हणाले, “भारताचे म्हणणे आहे की हा एक द्विपक्षीय मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी भीक मागत नाही. आम्ही शांतताप्रिय देश आहोत आणि आमचा विश्वास आहे की चर्चाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. पण चर्चा करण्यासाठी दोन बाजूंनी सहभाग आवश्यक असतो.” ते पुढे म्हणाले की,“जर भारत प्रतिसाद देत असेल, तर पाकिस्तान अजूनही चर्चा करण्यास तयार आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande