कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी
ओटावा, 17 सप्टेंबर (हिं.स.)।कॅनडामध्ये खालिस्तानी समर्थकांकडून होणारा हिंसाचार पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) हा संघटना भारताविरुद्ध कट रचण्याच्या तयारीत आहे. अधिक माहितीनुसार, एसएफजेने वँकूव्हरमधील भारताच्या वाणिज्य
कॅनडामध्ये खलिस्तानीं समर्थक


ओटावा, 17 सप्टेंबर (हिं.स.)।कॅनडामध्ये खालिस्तानी समर्थकांकडून होणारा हिंसाचार पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) हा संघटना भारताविरुद्ध कट रचण्याच्या तयारीत आहे.

अधिक माहितीनुसार, एसएफजेने वँकूव्हरमधील भारताच्या वाणिज्य दूतावासावर ताबा घेण्याची धमकी दिली आहे. तसेच, त्यांनी भारतीय नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचा इशाराही दिला आहे.तथापि, या प्रकरणावर भारत किंवा कॅनडा सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. खरंतर, अलीकडेच भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध पुन्हा सुरु झाले आहेत, आणि खालिस्तानी संघटनांना हे मान्य नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, एसएफजे संघटनेने वँकूव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला घेरण्याची धमकी दिली आहे. या विभाजनवादी संघटनेने म्हटले आहे की, गुरुवारी (१८ सप्टेंबर) ते दूतावासावर कब्जा करणार आहेत. एसएफजेने भारत आणि कॅनडाच्या नागरिकांना दूतावासाच्या परिसरापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.एसएफजेने एक पोस्टर देखील जारी केले आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांचा फोटो आहे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर गन टारगेटचे निशाण दाखवले आहे.

खालिस्तानी संघटना एसएफजेने आपल्या एका प्रोपगंडा पत्रात लिहिले आहे की, दोन वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत सांगितले होते की, हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्या प्रकरणात भारतीय एजंट्सचा सहभाग होता, आणि त्याची चौकशी चालू आहे. एसएफजेचा आरोप आहे की, भारतीय वाणिज्य दूतावास खालिस्तान जनमत चाचणीच्या प्रचारकांवर हेरगिरीचे जाळे चालवत आहे, ज्यामुळे त्यांचे काम अडथळ्यात येऊ शकते.

एक महत्त्वाची बाब म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या सरकारने एका अंतर्गत अहवालात देशात खालिस्तानी दहशतवादी संघटनांची उपस्थिती असल्याचे मान्य केले होते आणि भारताविरुद्ध दहशतीसाठी निधी कसा मिळतो, याचेही उल्लेख केले होते. या गटांमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ आणि ‘इंटरनॅशनल एसवायएफ’ यांचा समावेश आहे. हे दोन्ही गट कॅनडामध्ये दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande