रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताच्या समर्थनाबद्दल ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार
वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला ‘मित्र’ म्हणत त्यांच्या कामाचे कौतु
ट्रम्प यांनीमोदींचे मानले आभार


वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला ‘मित्र’ म्हणत त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी भारताच्या समर्थनाबद्दल आभार मानले.हा फोन कॉल दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे, विशेषतः अलीकडे व्यापार आणि टॅरिफबाबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले: “माझा मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चांगली चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या. ते खूप छान काम करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद! – प्रेसिडेंट DJT.” (Donald John Trump ) ट्रम्प यांनी त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांनी ही पोस्ट साईन केली, जी या संभाषणाच्या वैयक्तिक आणि मैत्रीपूर्ण स्वरूपाचे द्योतक आहे.

पंतप्रधान मोदी यांनीही या फोन कॉलसाठी ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले:“माझे मित्र प्रेसिडेंट ट्रम्प, माझ्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आपल्या फोन कॉल आणि मनःपूर्वक शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततामय तोडग्यासाठी तुमच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.”

हा फोन कॉल जून महिन्यात झालेल्या जी-७ शिखर परिषदेतील ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील शेवटच्या भेटीनंतरचा पहिला संवाद होता. त्या वेळेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात काही तणाव निर्माण झाले होते, विशेषतः जेव्हा ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले होते, ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदीवर २५ टक्के टॅरिफचा समावेश होता. ट्रम्प यांनी भारताच्या उच्च टॅरिफचेही तीव्र शब्दांत टीकाटिप्पणी केली होती आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही नवी दिल्लीतून कठोर भूमिका घेतली होती.

तथापि, गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, त्यांना ‘पक्की खात्री’ आहे की भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा ‘यशस्वी निष्कर्षां’पर्यंत पोहोचतील. त्यांनी असेही म्हटले की, त्यांना आपल्या ‘खूप चांगल्या मित्रा’ मोदींशी लवकर बोलण्याची उत्सुकता आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि अमेरिकेला नैसर्गिक भागीदार म्हणत म्हटले होते की, व्यापार चर्चेद्वारे दोन्ही देशांमध्ये असलेल्या भागीदारीच्या अमर्याद शक्यतांचा शोध घेतला जात आहे आणि त्यांनाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्याचीही वाट पाहत आहेत असे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande