नरेंद्र मोदीजींना दीर्घायुष्य, निरंतर लोकमान्यता आणि प्रगती लाभो - नीलम गोऱ्हे
मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि सेवा कार्याद्वारे साजरा होत आहे. या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्
नरेंद्र मोदीजींना दीर्घायुष्य, निरंतर लोकमान्यता आणि प्रगती लाभो - नीलम गोऱ्हे


मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि सेवा कार्याद्वारे साजरा होत आहे. या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकालातील उपलब्धींचा गौरव केला. “श्री अष्टविनायक, तुळजाभवानी, आई जगदंबा आणि श्री शिवकृष्ण यांच्या कृपेने मा. नरेंद्र मोदीजींना दीर्घायुष्य, निरंतर लोकमान्यता आणि प्रगती लाभो. सर्व भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते असेच अखंड परिश्रम करत राहोत, ही प्रार्थना आहे.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मा. मोदीजींनी पायाभूत सुविधा, शेती व तंत्रज्ञान, उद्योगजगत, क्रीडा, आयुर्वेद व योग, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत. ‘नमो शक्ती वंदन विधेयक’द्वारे महिलांना ३३% आरक्षण देऊन त्यात अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांचाही समावेश केला. हा निर्णय महिलांच्या सामाजिक-राजकीय प्रगतीसाठी मार्ग असणार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने परराष्ट्र धोरण, जागतिक विकास, रेल्वे वाहतूक (वंदेभारत), महामार्ग व पुलांचे नियोजन, संरक्षण क्षेत्र, तसेच अंतराळ संशोधन या सर्वच क्षेत्रांत झेप घेतली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्वारी-बाजरी-रागी यांसारख्या श्रीधान्यांना चालना देण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी विशेष नमूद केले की, “तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढून यशस्वी झाल्या. २०२४ मध्ये मा. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या संधीमुळे मला पुणे, मुंबई आणि माळशिरस येथील सभांमध्ये मा. मोदीजींचे विचार व्यासपीठावरून ऐकण्याची सुवर्णसंधी लाभली. कोणतीही राजकीय घराणेशाही नसताना सामाजिक कार्यकर्ती म्हणून हे क्षण माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.”

मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तीन तलाक विरोधात केंद्र सरकारने घेतलेली ठाम भूमिका भारतीय महिला नेहमीच स्मरणात ठेवतील. तसेच समान नागरी कायद्याच्या दिशेने घेतलेले पाऊल हेही धाडसी आणि दूरदृष्टीचे आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या पुनर्निर्माणाचा ऐतिहासिक निर्णय घेताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न्याय मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande