परभणी - सेवा पंधरवडात विविध विभागांमार्फत लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार
परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभा
सेवा पंधरवडा”त विविध विभागांमार्फत लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार


परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाला.

या पंधरवड्यामध्ये विविध शासकीय विभागांमार्फत लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महसूल, कृषी, आवास योजनांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासह लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भूमि अभिलेख विभागामार्फत स्वामीत्व योजनेअंतर्गत मिळकत प्रमाणपत्रांचे वाटप, कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना फवारणी किट, निमअस्त्र 5 लीटर बॉटल तसेच माती परिक्षण केलेल्या जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लक्ष रूपयांच्या अर्थसहायाचे वितरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड केलेल्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप, महिला व बालविकास विभागाअंतर्गत आई-वडील नसलेल्या बालकास अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहाय बचत गटांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण, प्रधानमंत्री आवास योजना भाग 2.0 अंतर्गत लाभार्थींना कार्यारंभ आदेशाचे वाटप, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीद्वारे लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण, जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाअंतर्गत प्रसूती झालेल्या महिलांना बेबीकेअर किटचे वाटप, जिल्हा पुरवठा विभागामार्फत प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, जिल्ह्यातील सेलू, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप, जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना आधार संचाचे वाटप यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande