मुंबई, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, अवर सचिव गोविंद साबणे, उपसचिव दिलीप देशपांडे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, दिलीप शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर