मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.)। : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, विधानपरिषद सदस्य संजय खोडके तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) विलास आठवले, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव पंडीत खेडकर, उप सचिव विजय कोमटवार, उप सचिव सोमनाथ सानप, उप सचिव तथा नियंत्रण अधिकारी स्वाती ताडफळे, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर