अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)।अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापुर पोलीस स्टेशन अंतर्गत कापुसतळणी येथील निर्मला हायस्कुल येथे ईयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा २० वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीचा शाळेत जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर पोस्को अंतर्गत कारवाई करुन दि.१६ अटक करण्यात आली. कापुसतळणी सर्कल अंतर्गत एकटी राहणाऱ्या महीलेची मुलगी निर्मला विद्यालय कापुस तळणी येथे शिक्षण घेतात व स्कूलव्हॕनने दररोज शाळेत येणे जाणे करतात महीला राहत असलेल्या गावातीलच एका शेतकऱ्यांकडे गेल्या दोन वर्षापासुन प्रकाश कास्देकर कामाला असून प्रकाश पिडीतेचा पाठलाग व तिचे घराकडे चकरा मारीत असे, आरोपी प्रकाश यास यापुर्वी पिडी तेच्या आईने हटकलेही होते. आरोपी मुलीचा वारंवार पाठलाग करुन तीची इच्छा नसतांना तीच्या सोबत जवळीक निर्मान करण्याचा प्रयत्न नित्याचीच बाब असतांना दि.१६ रोजी दहा वाजता आरोपी प्रकाश कास्देकर व त्याचा अल्पवयीन मित्र (दोन्ही रा.उपातखेडा ता.चिखलदरा) यांनी परीसीमा ओलांडत पिडीतेची शाळा निर्मला हायस्कुल येथील वर्ग सातव्या गाठत वर्ग शिक्षकास मुलीची विचारपुस करुन तिच्या आईने घ्यायला पाठवले आसे सांगत मुलीस घेऊन जाण्याचा प्रयत्न केला वर्गशिक्षक यांना शंका आल्याने शिक्षकाने प्रसंगावधानता राखत घरी फोन लावला असता मुलीची आई व तिचे चुलत भाऊ यांनी पोलीसांना घडामोड कळवत शाळा गाठली असता शिक्षकाचे प्रसंगावधानता ,मुलीची आई व नातेवाईक पोहचल्याने, पोलीसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. रहिमपूर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आरोपी प्रकाश कासदेकर व त्यांच्या अल्पवयीन सहकाऱ्यास ताब्यात घेतले असता पिडीतेच्या आईच्या तक्रीवरुन पोलीस स्टेशन रहीमापुर चिंचोली येथे आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत ७५(१) i, ७५(२) ,७८(२) ,३(५) अन्वये गुन्हे दाखल करून सहकलम बाल लैंगिक प्रतिबंधाच्या नुसार आरोपी प्रकिश कास्देकर यास अटक करण्यात आली आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपीस चौदा दिवसाचे एमसीआर दिला असुन पुढील चौकशी ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी. गजानन सोनवणे व पोलीस अधिकारी करत आहे .
शाळेच्या परिसरात रोड रोमीओचा सुळसुळाटनिर्मला हायस्कुल येथील शाळेच्या परीसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्य वेळेस रोडरोमीओंचा सुळसुळात असतो. शाळा व्यवस्थापन समितीच्या गलथान कारभारामुळे अशा घटना घडत असल्याचे नागरीकांमध्ये चर्चा आहे. शाळा व्यवस्थापन समीतीने यावर कडक उपाययोजना न केल्यास पुनःच याप्रकारच्या घटना घटण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी