पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषदेची छ. संभाजी नगर येथे बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषद (MOEFCC – महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभाग) अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पा
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषद (MOEFCC – महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभाग) अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर हे होते. तर प्रमुख उपस्थितीत खुशालसिंह परदेशी अतिरिक्त विभागीय आयुक्त, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या भागातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण १७ संस्था प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग नोंदविला.

बैठकीच्या प्रारंभी जयाजी पाईकराव यांनी प्रस्तावना करून बैठकीचे उद्देश व महत्त्व विषद केले. त्यानंतर MEFCCPC ची संकल्पना PPT द्वारे सादर करण्यात आली.

सुपर्ण जगताप यांनी मराठवाड्यातील जमीन, जंगल व जैवविविधतेची सद्यस्थिती तसेच बीज महोत्सव, चला सावली पेरूया, हरित उत्सव, जैवविविधता केंद्र उभारणी अशा विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. मुरलीधर बेलखुडे यांनी वर्धा जिल्ह्यातील ‘ऑक्सिजन पार्क’चा यशस्वी अनुभव मांडला. प्रा. सारंग साळवी यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती व शालेय स्तरावरील समित्या यांची गरज व्यक्त केली. विठ्ठलराव बदखल यांनी शेतकरी व वन्यप्राणी संघर्ष, पिकांचे नुकसान व शाश्वत वृक्ष लागवड यावर मते मांडली.

बैठकीदरम्यान आयुक्त श्री. पापळकर यांनी सर्व संस्थांनी जिल्हास्तरावर एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले. शासकीय योजना व स्वयंसेवी संस्थांचे उपक्रम यांचा संगम घडवून आणावा, असे त्यांनी सांगितले. वित्तीय तरतूद करणे शक्य नसले तरी एक गाव – एक तालुका या पद्धतीने निवडून काम केल्यास ठोस परिणाम साधता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘चला जाणुया नदीला’ या अभियानाचे यशस्वी उदाहरण जयाजी पाईकराव यांनी सादर केले. विद्यार्थी व युवकांनी एकत्रितपणे झाडे लावल्यास मोठी चळवळ उभी राहू शकते, यावर सर्वांचे एकमत झाले.

बैठकीचा समारोप आनंद आसोलकर यांनी आभार प्रदर्शन करून केला.

पुढील दिशा :

• जिल्हाधिकारी स्तरावर नियोजन व सहकार्य पत्राद्वारे पर्यावरण संवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी.

• प्रत्येक जिल्ह्यात संस्थांमधील समन्वय वाढवून शाश्वत उपक्रम राबविणे.

• विद्यार्थी व युवकांच्या सहभागातून हरित चळवळ अधिक प्रभावी करणे.

• जिल्हास्तरीय ग्राम वनांची निर्मिती करणे.

• पर्यावरण योद्धा, तालुका पर्यावरण प्रेमी, गाव पर्यावरण प्रेमी, नदी प्रहरी सदस्य अशा प्रकारचे साखळी संघटन करून महाराष्ट्राच्या सर्व भागात याची अंमलबजावणी करणे.

• प्रत्येक शाळेने एक मुल एक झाड या संकल्पनेची अंमलबजावणी करणे.

बैठकीस उपस्थित प्रमुख प्रतिनिधी / पर्यावरण पारिषद जिल्हाध्यक्ष:

अभय देशपांडे (नंदुरबार), प्रदीपकुमार क्षेत्रीय- राज्य निर्देशक (नंदुरबार), जयाजी पाईकराव (हिंगोली), आनंदराव आसोलकर (छ. संभाजीनगर), भिमराव भिसे (हिंगोली), सारंग साळवी (परभणी), संतोष रेपे (बीड), सुपर्ण जगताप (लातूर), पुष्कराज तायडे (जालना), अमृत सोनवणे (लातूर), डॉ. बी. आर. पाटील (धाराशिव), सिद्धार्थ सोनवणे (बीड), मुरलीधर बेलखोडे (वर्धा), दुर्गा भड (अकोला), यशंवत पांडे (अमरावती), विठ्ठल बदखल (चंद्रपूर). यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande