छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत आयोजीत, महाराष्ट्र गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवार दि. 21 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते 12 व दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हाकेंद्रावर एकूण 12 केंद्रांवर 3960 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षेसाठी एकूण 423 अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.
परीक्षा केंद्रांची यादी याप्रमाणे-
न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पिसादेवी रोड, भगतसिंग नगर हर्सुल, (288)
मौलाना आझाद महाविद्यालय, कला, विज्ञान व वाणिज्य शाखा, रोजाबाग पार्ट - अ (288)
मौलाना आझाद महाविद्यालय, कला, विज्ञान व वाणिज्य शाखा, रोजाबाग पार्ट - ब (288)
एम.जी.एम. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय, सेव्हन हिल (480)
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्यालय, एमजीएम विद्यापीठ, एन- 6 (288) सरस्वती भूवन विज्ञान महाविद्याालय, औरंगपूरा (264)
सरस्वती भूवन मुलाची शाळा, औरंगपूरा (432)
विवेकानंद कला व सरदार दिलिपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर - (288) विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर -(288)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपूरा (288)
शासकीय तंत्रनिकेतन,महाविद्यालय, उस्मानपूरा (288)
शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर (288
परिक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
परिक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेरा,फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
सुधारीत कार्यपद्धतीनूसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.
परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही.
परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis