छ. संभाजीनगर - भगवान बाबा बालिकाश्रमास डॉ.नीलम गोऱ्हे आणि आदिती तटकरे यांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)।महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजलेल्या छत्रपती संभाजी नगर येथील भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज गुरुवारी भेट दिली. विधान परिषदेच्या उपसभापत
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)।महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजलेल्या छत्रपती संभाजी नगर येथील भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज गुरुवारी भेट दिली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिका आश्रमास भेट देऊन येथील मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली.

त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार,महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी,भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधत बालगृहातील अडचणी जाणून घेतल्या. बालगृहातील मुलींनी आपल्या कलागुणातून साकार केलेल्या पेंटिंग्स आणि फ्रेम याविषयी माहिती दिली. मंत्री अदिती तटकरे तसेच नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मुलीशी संवाद साधून कौतुकाची थाप दिली. यावेळी श्रीमती तटकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसेच पत्रकारांशी संवाद साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande