छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सबंध देशभरात सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने, या पंधरवड्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर महिला मोर्चा कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. श्री. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सेवा पंधरवडा शहर संयोजक श्री. प्रशांत भदाणे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.उज्वलाताई दहिफळे, सचिव श्री. सिद्धार्थ साळवे, सचिव श्री. कल्याण धुळे, मंडळ अध्यक्ष श्री. महेश मल्लेकर यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis