शेतीचे प्रश्न आता उत्तरांसह महाविस्तार ऍपवर
रायगड, 18 सप्टेंबर, (हिं.स.) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महाविस्तार या नव्या एपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या ऍपचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महाविस्तार या नव्या अॅपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.  महाविस्तार अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज, पीक सल्ला, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, बाजारभाव अशा सर्व गोष्टींची माहिती या अॅपमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे, या अॅपमध्ये आपल्या गावाजवळ असलेल्या अवजारे बँकांची माहितीही समाविष्ट आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे भाड्याने घेणे अधिक सुलभ होईल.  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच महाडीबीटीवरील सर्व योजनांची सविस्तर माहिती अॅपमध्ये देण्यात आलेली असून, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शनही येथे मिळते. त्याचबरोबर ऑनलाईन शेती शाळा आणि नवनवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित व्हिडीओही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरून महाविस्तार अॅप डाऊनलोड करून आपल्या शेतकरी आयडीने लॉगिन करावे. नाव, गाव, तालुका ही माहिती भरल्यानंतर गावनिहाय आणि तालुकानिहाय माहिती त्यांना मिळेल. अॅपच्या मला प्रश्न विचारा या सुविधेमुळे शेतकरी त्यांच्या शंका आणि प्रश्न थेट विचारू शकतात.  शेतीतील हा डिजिटल मित्र प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात असावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही श्रीमती शिंदे यांनी नमूद केले. या अॅपविषयी अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


रायगड, 18 सप्टेंबर, (हिं.स.) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महाविस्तार या नव्या एपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या ऍपचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

महाविस्तार एक,ऍपद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज, पीक सल्ला, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, बाजारभाव अशा सर्व गोष्टींची माहिती या ऍपमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे, या ऍपमध्ये आपल्या गावाजवळ असलेल्या अवजारे बँकांची माहितीही समाविष्ट आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे भाड्याने घेणे अधिक सुलभ होईल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच महाडीबीटीवरील सर्व योजनांची सविस्तर माहिती ऍपमध्ये देण्यात आलेली असून, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शनही येथे मिळते. त्याचबरोबर ऑनलाईन शेती शाळा आणि नवनवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित व्हिडीओही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरून महाविस्तार ऍप डाऊनलोड करून आपल्या शेतकरी आयडीने लॉगिन करावे. नाव, गाव, तालुका ही माहिती भरल्यानंतर गावनिहाय आणि तालुकानिहाय माहिती त्यांना मिळेल. अॅपच्या मला प्रश्न विचारा या सुविधेमुळे शेतकरी त्यांच्या शंका आणि प्रश्न थेट विचारू शकतात.

शेतीतील हा डिजिटल मित्र प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात असावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही श्रीमती शिंदे यांनी नमूद केले. या ऍपविषयी अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande