नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.) देशाच्या अर्थव्यवस्थेत चालक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. समाजात चालकांना योग्य तो सन्मान मिळण्याची आवश्यकता आहे. उद्योग, व्यापार, शेती, शहर-गाव यांना जोडणारी वाहतूक ही जीवनवाहिनी आहे आणि ही जीवनवाहिनी अखंड चालू ठेवण्याचे काम चालक बांधव करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, सुरक्षिततेवर भर देणे आणि त्यांचा सार्वजनिक सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित “चालक दिन सोहळा” लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉल पंचवटी येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी , प्रकाश केसरकर, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, मासीचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय पिसे, योग शिक्षिका प्रतिमा फड, वाहतूक मित्र सचिन जाधव, सौ.मिना लांडगे, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी, सेक्रेटरी बजरंग शर्मा , महेंद्रसिंग राजपूत,सल्लागार सुनील बुरड,जे.पी. जाधव,आभेरामजी, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी,राजेश सिंगल,जे.पी इंदोरीया, दलबीर परधान, शक्तिसिंग राजपुरोहित,बाबुलाल स्वामी,दिपक ढिकले, सुभाष जांगडा,दलजीत मेहता,अशोक वाघ, शंकर धनावडे, माणिक मेमाने,महावीर शर्मा, सियाराम शर्मा,रमेश शर्मा,रमेश सारस्वत, सदाशिव पवार,दिपक ताकाटे,गणेश नागरे, प्रविण नागरे,तेजपाल सोढा, बळीराम कदम,देव शर्मा,सतिश कलंत्री,अश्विनी दुबे, नाना पाटील,आश्विन आत्री,, मनोज उदावंत,संदीप बिर्ला यांच्यासह पदाधिकारी व चालक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV