लातूर : शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)हंडरगुळी ता.उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्
अ


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)हंडरगुळी ता.उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वाभिमान व विचार आमच्या आयुष्याचे दिशादर्शक असून, या पुतळ्याच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, असे मत यावेळी व्यक्त केले. हा ऐतिहासिक सोहळा तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला असून, प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि प्रेरणेची नवी ज्वाला चेतवून गेला.

प्रसंगी या पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, जिल्हा नियोजन माजी सदस्य श्याम ढवळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बालाजीराव भोसले, सरपंच विजयकुमार आंबेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बिरादार, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, शहराध्यक्ष जामीनिया शेख, माजी तालुकाध्यक्ष अर्जुन मामा आगलावे, जळकोट तालुका अध्यक्ष संग्राम हासुरे पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब मारापल्ले, मयूर बनसोडे, अमोल निडवदे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव माने, , सर्व शिवप्रेमी, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande