लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। उदगीर येथे होणाऱ्या राज्यव्यापी लिंगायत वधू वर मेळाव्याच्या भिती पत्रकाचे अनावरण आज औसा हिरेमठ संस्थांचे शिवाचार्य शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले आहे.
लिंगायत महासंघ शाखा उदगीर च्या वतीने लिंगायत महासंघाचे प्रांत अध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, 28 सप्टेंबर रोजी भगीरथ मंगल कार्यालय डॅम रोड उदगीर येथे होणाऱ्या लिंगायत समाजाच्या सातव्या राज्यव्यापी वधु वर परिचय मेळाव्याच्या भिती पत्रकाचे अनावरण आज लातूर येथे औसा हिरेमठ संस्थांचे शिवाचार्य शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिंगायत महासंघाचे प्रांतअध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार लिंगायत महासंघाचे चाकूर तालुका अध्यक्ष सुभाष शंकरे, औसा अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता अँड गंगाधर हामने आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis