इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
इगतपुरी, 18 सप्टेंबर (हिं.स.)। - नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करणे बाबत सुचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडुन द
शहरात अवैध कॉलसेंटरवर  ग्रामीण पोलिसांचा छापा  ; २ जण अटक ,  २४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल व सिमकार्ड जप्त


इगतपुरी, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

- नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करणे बाबत सुचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडुन देण्यात आल्या होत्या.

इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता मिनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. ह्या ठिकाणी क्रेडिटकार्ड द्वारे दिलेले लोन, गृह कर्ज व संबंधित कर्जाची वसुली करण्यासाठी कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करुन बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करुन त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली. म्हणुन इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध कॉल सेंटर चालविणारे १. नरेंद्र शशीकांत भोंडवे वय ३२ वर्ष, रा. महात्मा गांधी नगर, महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी, २) पारस संजय भिसे, वय २६ वर्षे रा. रमाबाई कॉलनी, प्रयदर्शनी चाळ कमीटी घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. या कारवाईत २४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपकंपन्यांचे ण्याचे मोबाईल फोन व सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलन करत असल्याचे दिसुन आलेले आहे. या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कॉल सेंटरवर आरबीएल, एचडीबी फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्जवसुलीसाठी काम करत असल्याचे दिसुन आले आहे. ह्या गुन्ह्याचा तपास नागेश मोहीते सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande