टोकियो, 18 सप्टेंबर (हिं.स.) टोकियो येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांना पदक जिंकता आले नाही. आणखी एक भारतीय भालाफेकपटू सचिन यादवने ८६.२७ मीटरचा कारकिर्दीतील सर्वोत्तम भालाफेक केली चौथ्या. पण तो चौथ्या स्थानावर राहिला. सचिनचे कांस्यपदक केवळ ४० सेंटीमीटरने हुकले. कांस्यपदक विजेत्याने ८६.६७ मीटर भालाफेक केली.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने ८८.१६ मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकसह सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने (८७.३८ मीटर) रौप्यपदक जिंकले आणि अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसनने (८६.६७ मीटर) कांस्यपदक जिंकले. गतविजेता नीरजने पाच प्रयत्नांमध्ये ८४.०३ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक केला आणि आठवे स्थान मिळवले. दरम्यान, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम चार प्रयत्नांमध्ये ८२.७५ मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकसह १० व्या स्थानावर राहिला.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो ८३.६५ मीटर होता. त्याचा दुसरा थ्रो ८४.०३ मीटर होता आणि त्याचा तिसरा थ्रो फाऊल होता. त्याच्या चौथ्या प्रयत्नात त्याने ८२.८६ मीटर फेकले. चार फेऱ्यांनंतर त्याचा सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. त्याचा पाचवा प्रयत्न फाऊल होता. ज्यामुळे तो पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडला.नदीमचा पहिला थ्रो ८२.७५ मीटर होता. त्याचा दुसरा थ्रो फाऊल होता. त्याचा तिसरा प्रयत्न ८२.७३ मीटर होता. त्याचा चौथा प्रयत्न फाऊल होता. ज्यामुळे तो पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडला.
या दोघांच्या पुढे सचिन यादव होता. सचिनचा पहिला थ्रो ८६.२७ मीटर होता. त्याचा दुसरा थ्रो फाऊल होता. त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.७१ मीटर फेकले. त्याचा चौथा थ्रो ८४.९० मीटर होता. त्याने पाचव्या प्रयत्नात ८५.९६ आणि सहाव्या प्रयत्नात ८०.९५ गुण मिळवले. यामुळे तो ८६.२७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह चौथ्या स्थानावर आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे