करमाळा हद्दीत 29 विद्युत मोटारींची चोरी
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। करमाळा खातगाव हद्दीतील शेतकर्‍यांच्या उजनी जलाशयाच्या काठावरील 20 शेतकर्‍यांच्या तब्बल 29 इलेक्ट्रिक मोटारींची चोरी झाली असून, शेतकर्‍यांचे 15 लाखांचेे नुकसान झाले आहे. उजनी धरण 117 टक्के भरले आहे. त्यातच सततच्या पा
करमाळा हद्दीत 29 विद्युत मोटारींची चोरी


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। करमाळा खातगाव हद्दीतील शेतकर्‍यांच्या उजनी जलाशयाच्या काठावरील 20 शेतकर्‍यांच्या तब्बल 29 इलेक्ट्रिक मोटारींची चोरी झाली असून, शेतकर्‍यांचे 15 लाखांचेे नुकसान झाले आहे. उजनी धरण 117 टक्के भरले आहे. त्यातच सततच्या पावसाने शेतकर्‍यांनी शेतीपंपाच्या मोटारी खातगाव जुना रेल्वेपुलालगत ठेवल्या होत्या. चोरट्यांनी शेतीपंपाच्या तब्बल 29 मोटारींची वायर कापून चोरी केल्याचा प्रकार घडला. याबाबत खातगाव येथील काही शेतकर्‍यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथे शेतकर्‍यांनी केला आहे. प्रशासनाने आमची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा या वाढत्या केबल व मोटारी चोरी रोखण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande