युएनमध्ये बलुच आर्मीवरील बंदीचा प्रस्ताव नाकारला
- अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स देशांनी केला विरोध नवी दिल्ली , 19 सप्टेंबर (हिं.स.)। संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिच्या आत्मघाती पथक ‘मजीद ब्रिगेड’वर बं
संयुक्त राष्ट्रांने बलुच आर्मीवर बंदी घालण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला


- अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स देशांनी केला विरोध

नवी दिल्ली , 19 सप्टेंबर (हिं.स.)। संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिच्या आत्मघाती पथक ‘मजीद ब्रिगेड’वर बंदी घालण्याच्या संयुक्त प्रस्तावाला विरोध केला आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा अमेरिकेने अलीकडेच या दोन्ही संघटनांना ‘विदेशी दहशतवादी संघटना’ घोषित केले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या 1267 प्रतिबंध यंत्रणेअंतर्गत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांनी या प्रस्तावाला नकार दिला. आणि याचे कारण दिले की बीएलए आणि मजीद ब्रिगेडला अल-कायदा किंवा आयएसआयएल सोबत थेट जोडणारे पर्याप्त पुरावे नाहीत.

संयुक्त राष्ट्राची 1267 प्रतिबंध यंत्रणा (1999चा प्रस्ताव) अल-कायदा, तालिबान आणि आयएसआयएलशी संबंधित व्यक्ती किंवा संघटनांवर प्रवास बंदी, मालमत्ता गोठवणे आणि शस्त्रांवर बंदी अशा स्वरूपाचे निर्बंध लावते.

पाकिस्तान आणि चीनने मिळून सुरक्षा परिषदेत 1267 समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला होता. बुधवारी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी दावा केला की आयएसआयएल-के, अल-कायदा, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), बीएलए आणि मजीद ब्रिगेड सारख्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातून कार्यरत आहेत आणि तेथून पाकिस्तानमध्ये सीमापार हल्ले करत आहेत.

त्यांनी असंही म्हटलं की, आतंकवाद ही पाकिस्तानसाठी एक मोठी राष्ट्रीय सुरक्षा समस्या आहे आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने आपल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.

उल्लेखनीय म्हणजे, मागील महिन्यात अमेरिकेने बीएलए आणि तिच्या मजीद ब्रिगेडला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. याआधीही, 2019 मध्ये अमेरिकेने बीएलए ला ‘विशेषतः नामांकित जागतिक दहशतवादी संघटना (एसडीजीटी )’ म्हणून घोषित केलं होतं. तेव्हापासून या संघटनेने अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यात आत्मघाती हल्ले आणि मजीद ब्रिगेडचे मोठे दहशतवादी हल्ले समाविष्ट आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande