नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली असून पूरग्रस्त शेतकरी बांधवांना ५५३.४८ कोटींची मदत मिळणार आहे.पालकमंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
हा निधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. ऑगस्ट महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान लक्षात घेऊन महायुती सरकारतर्फे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महायुती सरकार कायम तत्पर आहेत! असे ते म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis