सौदी अरेबियासोबत संरक्षण करारासाठी तिसऱ्या पक्षाशी चर्चेची आवश्यकता नव्हती - ख्वाजा आसिफ
इस्लामाबाद, 19 सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियासोबत झालेल्या म्युच्युअल डिफेन्स डीलसाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाशी चर्चा करण्याची आवश्यकता नव्हती, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले. हे विधान आसिफ यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरा
ख्वाजा आसिफ


इस्लामाबाद, 19 सप्टेंबर (हिं.स.)। सौदी अरेबियासोबत झालेल्या म्युच्युअल डिफेन्स डीलसाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाशी चर्चा करण्याची आवश्यकता नव्हती, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले. हे विधान आसिफ यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरात दिले, ज्यामध्ये विचारले गेले होते की, “ सौदी अरेबियासोबत कराराबाबत अमेरिका विश्वासात होता का?”

ख्वाजा आसिफ म्हणाले, “माझ्या मते, या करारात तिसऱ्या कोणत्याही पक्षाची भूमिका किंवा हस्तक्षेप योग्य नाही. हा करार कोणत्याही वर्चस्ववादी व्यवस्थेचा भाग नाही, तर एक संरक्षणात्मक व्यवस्था आहे. आमची कोणत्याही देशाची भूमी ताब्यात घेण्याची किंवा आक्रमण करण्याची योजना नाही, पण आमचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याची परवानगी आम्ही कोणालाही देणार नाही, आणि आम्ही आमचा अधिकार वापरला आहे.” ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, “सौदी अरेबियामधील पवित्र इस्लामी स्थळांचे रक्षण करणे हे पाकिस्तानचे परम कर्तव्य आहे.”

पाकिस्तानात सुरक्षा दलांवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा जुना दावा मांडला की, “अफगाण भूमीचा वापर पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जात आहे.”

त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही अफगाणिस्तानसोबत दोन युद्धांत अडकलेलो होतो. दोन्ही वेळा अमेरिका या भागातून निघून गेला, पण आजही त्याचे परिणाम आम्हालाच भोगावे लागत आहेत. मग ते तालिबान असो, टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान), बीएलए (बलुचिस्तान लिबरेशन आर्मी) किंवा अन्य कुठलाही गट.” ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानला एक शत्रू देश म्हणून संबोधले आणि म्हटले की, “मी स्पष्ट सांगतो की काबुल सरकार निर्दोष नाही. ते या दहशतवादी गटांचा वापर करून आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत.”

जेव्हा त्यांना विचारले गेले की, “अरब देश अफगाणिस्तानच्या आक्रमकतेला उत्तर देतील का?”, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात 17 सप्टेंबर रोजी एक स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करार झाला आहे, ज्यामध्ये असं नमूद आहे की, “जर या दोन देशांपैकी कोणावरही हल्ला झाला, तर तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल.” या करारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

हा करार कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायल हल्ल्याच्या काही दिवसांनीच झाला आहे. कतार आणि सौदी अरब हे दोघेही खाडी क्षेत्रातील अमेरिकेचे महत्त्वाचे सहयोगी मानले जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande