पंतप्रधान मोदींसोबत गाडीत झालेल्या चर्चेवर पुतिन यांचा खुलासा
मॉस्को, 4 सप्टेंबर (हिं.स.)।चीनमध्ये मागील आठवड्यात झालेल्या एससीओ समिटदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारमध्ये दिसले, आणि याबाबत जगभर
पंतप्रधान मोदींसोबत रशियाचे अध्यक्ष पुतिन


मॉस्को, 4 सप्टेंबर (हिं.स.)।चीनमध्ये मागील आठवड्यात झालेल्या एससीओ समिटदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारमध्ये दिसले, आणि याबाबत जगभर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे 50 मिनिटे संवाद साधला, मात्र ही चर्चा कोणत्या विषयावर झाली होती, हे स्पष्ट झाले नव्हते.आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः खुलासा केला आहे की कारमध्ये त्यांचं आणि पंतप्रधान मोदींमधील संभाषण कोणत्या विषयावर होतं.

रशियन मीडियानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी चीनमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले, “ही काही गुपित गोष्ट नाही, मी त्यांना (मोदींना) सांगितले की आम्ही अलास्कामध्ये काय चर्चा केली.” युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून पुतिन यांनी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी अलास्कामध्ये भेट घेतली होती. पुतिन यांनी ही गोष्ट त्याच बैठकीच्या संदर्भात पत्रकारांना सांगितली.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे एक तास एकांतात चर्चा केली. पेसकोव यांनी पुतिन यांच्या चीन दौऱ्याचे वार्तांकन करत असलेल्या एका टीव्ही रिपोर्टरला सांगितले, “जेव्हा एखादी महत्त्वाची चर्चा सुरू असते, तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाणे किंवा अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. ते दोघेही तिथे आरामात आणि सहज होते, आणि म्हणूनच त्यांनी आपली चर्चा सुरूच ठेवली.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉस्कोमधील तज्ज्ञांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची लिमोझिन ही कोणतीही संभाषण ऐकू येऊ नये म्हणून पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आली आहे. कदाचित हीच कारणे असावीत की दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशील द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की कदाचित ही मोदी आणि पुतिन यांच्यातील सर्वात महत्त्वाची गोपनीय चर्चा होती, ज्यामध्ये त्यांनी असे विषय हाताळले असावेत जे “इतरांच्या कानांसाठी नव्हते.”

अलास्कामध्ये ट्रंप यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरही संवाद झाला होता. या दरम्यान पुतिन यांनी अलास्कामधील बैठकीबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत लिहिले होते, “माझ्या मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे धन्यवाद, फोन कॉलसाठी आणि अलास्कामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासोबत झालेल्या अलीकडील बैठकीबाबत माहिती शेअर केल्याबद्दल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande