पालघर - अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था, मोखाडा येथील मॅनेजर अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. वयाच्या ५८ व्या वर्षी नियोजित वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले.
अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न


पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था, मोखाडा येथील मॅनेजर अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. वयाच्या ५८ व्या वर्षी नियोजित वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले.

सन २००४ साली लिपिक पदावर रुजू झालेले जगताप यांनी आपल्या मेहनत, कर्तव्यनिष्ठा आणि सुनियोजित कार्यशैलीच्या जोरावर संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. कार्यकाळात त्यांनी केवळ कार्यालयीन वेळेतच नव्हे, तर वेळ संपल्यानंतरही सभासद व संचालक मंडळाच्या कामांना प्राधान्य देऊन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. वक्त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना संस्थेच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

या सोहळ्यास संस्थेचे संस्थापक रविंद्र देवरे, प्रथम माजी चेअरमन बच्छाव, द्वितीय माजी चेअरमन भरत गारे, माजी उपाध्यक्ष रियाज अजीज शेख, विद्यमान उपाध्यक्ष नंदकुमार पवार, संचालक हेमंत लहानगे, ईश्वर पाटील, भाऊ नावळे, अनंता भुसारे तसेच भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा संघटक भालचंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चेअरमन संतोष मधुकर पाटील यांनी भूषविले. या वेळी पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande