रायगड - जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा पुढाकार
रायगड, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। पनवेल परिसरातील पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मदत संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला. त्यांनी जनतेला सहकार्य
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा पुढाकार


रायगड, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। पनवेल परिसरातील पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मदत संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला. त्यांनी जनतेला सहकार्याचे आवाहन करताना सांगितले की, “अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकदिलाने पुढे येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा.”

या उपक्रमात प्रामुख्याने अन्नधान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य, औषधे व जीवनावश्यक वस्तू संकलित करून पूरग्रस्त भागात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की, “पूरग्रस्त बांधवांसाठी थोडीशी मदतही मोठा दिलासा ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने सहकार्य करावे.” कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा सरचिटणीस श्री. नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष श्री. सुमित झुंजारराव, नवीन पनवेल शहर अध्यक्ष श्री. दशरथ म्हात्रे, नगरसेविका सौ. सुरेखा मोहोकर तसेच शहर सरचिटणीस श्री. रुपेश नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने घेतलेला हा उपक्रम पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक पाठबळ देणारा ठरत असून समाजातील सहृदय नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पनवेलकर नागरिकांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमांना दिलेला हातभार यावेळीही मोठ्या प्रमाणात मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande