नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अलीकडील महापुरामुळे रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी पूर्णपणे वाहून गेली. या पूरप्रलयात कपाटे, तांब्या-पितळेची पूजावस्त्रे, अलंकार, दानपेट्या, अगदी पूजेचे पठारदेखील नदीच्या प्रचंड लाटांसोबत नाहीसे झाले. या मोठ्या नुकसानीनंतरही गोदा सेवकांची श्रद्धा आणि आत्मविश्वास अढळ राहिला आहे.
गोदा सेवकांनी एकत्रितपणे पुनश्च उभारणीचा निर्धार केला आहे. धैर्य आणि ऐक्याच्या जोरावर आपण पुन्हा गोदाकुटी उभी करू. या कार्यात सर्व सभासदांनी प्रार्थना, सेवा आणि योगदानाच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.
नुकसान प्रचंड असले तरी महाआरती आणि सेवा अखंड सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भक्तिभावच आपल्या आरत्या आणि सेवांना सदैव जिवंत ठेवील, असेही सेवकांनी नमूद केले.
नासिक नागरिक व भक्तांनी अशाप्रसंगी समितीच्या पाचशे ठामपणे उभे राहावे असे नम्र आवाहन समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी , सचिव मुकुंद खोचे उपाध्यक्ष, नृसिंह कृपादास , धनंजय बेळे, शैलेश देवी , राजेंद्र फड , शिवाजी बोंदार्डे, प्रफुल्ल संचेती , यांनी केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV