डच प्रशिक्षक ओल्टमन्स पुन्हा भारतीय हॉकी संघासोबत काम करण्यास ईच्चुक
पाटणा, 3 सप्टेंबर (हिं.स.)डच प्रशिक्षक आणि भारतीय पुरुष संघाचे माजी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स पुन्हा भारतात काम करण्यास तयार आहेत. पण पूर्णवेळ जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत. पाच वर्षे भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले ७१ वर्षीय ओल्टमन्स यांना २
रोएलंट ओल्टमन्स


पाटणा, 3 सप्टेंबर (हिं.स.)डच प्रशिक्षक आणि भारतीय पुरुष संघाचे माजी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स पुन्हा भारतात काम करण्यास तयार आहेत. पण पूर्णवेळ जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत. पाच वर्षे भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले ७१ वर्षीय ओल्टमन्स यांना २०१७ मध्ये सततच्या खराब कामगिरीनंतर काढून टाकण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी म्हटले होते की, भारतात काम करणे सोपे नाही विशेषतः खेळांमध्ये.

बिहारमधील राजगीर येथे सुरु असलेल्या आशिया कपमध्ये चिनी संघासोबत गेलेल्या ओल्टमन्स म्हणाले की, त्यांना पूर्णवेळ भूमिका नको आहे, पण कोणत्याही राष्ट्रीय संघासोबत सल्लागार म्हणून अल्पकालीन भूमिकेसाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'पूर्णवेळ प्रशिक्षकांना लांब दौऱ्यावर जावे लागते आणि मोठे करार देखील करावे लागतात. मला आता ते नको आहे. माझे लक्ष अल्पकालीन करारांवर आहे.'

भारतात पुन्हा काम करायला आवडेल का असे विचारले असता तो म्हणाला, 'कोणाला माहिती, काहीही सांगू शकत नाही.' भारत सोडल्यानंतर, ओल्टमन्सने मलेशिया आणि पाकिस्तानसोबतही काम केले आहे. ओल्टमन्सने आशिया कपमध्ये भारताला एक मजबूत दावेदार म्हटले, पण भारतीय हॉकीबद्दल जास्त बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, 'भारत हा आशियातील सर्वोत्तम संघ आहे. याशिवाय मला भारताबद्दल जास्त बोलायचे नाही.'

गेल्या वर्षी, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, ओल्टमन्सने अचानक पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि अल्पकालीन करारही स्वीकारला नाही. ते म्हणाला, 'आता मी पाकिस्तानसोबत पुन्हा काम करणार नाही. कोणतेही पेमेंट बाकी नाही. सर्व काही ठीक आहे पण त्यासाठी खूप वेळ आणि संयम लागला.' भारतीय संघ आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर-फोर फेरीत पोहोचला आहे. भारताव्यतिरिक्त चीन, दक्षिण कोरिया आणि मलेशियाचा समावेश आहे. भारताला या तिन्ही संघांचा सामना करावा लागणार आहे. अंतिम फेरीत अव्वल दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande