टीम इंडियाच्या जर्सीचे स्पॉन्सरशिप आता होणार महाग; बीसीसीआयने वाढवले ​​दर
मुंबई, 5 सप्टेंबर (हिं.स.)। बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरशिपच्या दरांमध्ये मोठा बदल केला आहे. आता कोणत्याही कंपनीला टीम इंडियाच्या जर्सीवर आपला लोगो लावण्यासाठी यापूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिका
टीम इंडियाच्या जर्सीचे स्पॉन्सरशिप आता होणार महाग


मुंबई, 5 सप्टेंबर (हिं.स.)। बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरशिपच्या दरांमध्ये मोठा बदल केला आहे. आता कोणत्याही कंपनीला टीम इंडियाच्या जर्सीवर आपला लोगो लावण्यासाठी यापूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी प्रति सामना 3.5 कोटी रुपये आणि मल्टीनॅशन स्पर्धांसाठी प्रति सामना 1.5 कोटी रुपये आकारले जातील.

हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा टीम इंडियाचा विद्यमान जर्सी स्पॉन्सर ड्रीम 11 करारातून बाहेर पडला आहे. 2025 मध्ये सरकारने लागू केलेल्या ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि विनियमन अधिनियमानंतर, ड्रीम 11 ला जर्सी स्पॉन्सरशिपचा त्याग करावा लागला आहे.

अहवालानुसार, याआधी द्विपक्षीय सामन्यांसाठी 3.17 कोटी रुपये आणि मल्टीनॅशनल स्पर्धांसाठी 1.12 कोटी रुपये दर निश्चित होते. म्हणजेच, नवीन दर हे जुन्या दरांपेक्षा थोडे जास्त आहेत. या बदलामुळे बीसीसीआयला 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याचा अंदाज आहे, तरी अंतिम आकडा बोली प्रकियेवर अवलंबून असेल.

नवीन दर एशिया कपनंतर लागू होतील. मात्र, भारताची टीम हा एशिया कप कोणत्याही जर्सी स्पॉन्सरशिविना खेळणार आहे, कारण बीसीसीआयने नवीन बोली सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर ठेवली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की बोली लावणारी कोणतीही कंपनी किंवा संबंधित संस्था ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगार यांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असता कामा नये. तसेच, अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक किंवा मालकीही नसावी.

ऑनलाइन गेमिंग अधिनियम 2025 लागू झाल्यानंतर ड्रीम 11 ने रिअल मनी गेम्स बंद केले, ज्यामुळे त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपमधूनही पाठ फिरवली.

आता बीसीसीआय नवीन स्पॉन्सरच्या शोधात आहे, आणि पाहावं लागेल की या महागड्या दरांवर कोणती कंपनी टीम इंडियाची नवीन जर्सी स्पॉन्सर बनते. भारतीय क्रिकेट संघ 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी युएइ विरुद्ध होईल. त्यानंतर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगेल. लीग स्टेजमधील आपला तिसरा आणि शेवटचा सामना भारत 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande