छ. संभाजीनगर गणेश महासंघ छावणी आयोजित कुस्ती स्पर्धेचे उदघाटन
छत्रपती संभाजीनगर, 5 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेश महासंघ छावणी आयोजित कुस्ती स्पर्धेचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी
कुस्ती


छत्रपती संभाजीनगर, 5 सप्टेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेश महासंघ छावणी आयोजित कुस्ती स्पर्धेचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राला कुस्तीचा मोठा समृद्ध वारसा लाभलेला आहे, अशा स्पर्धांमुळे तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायला मदत होते. कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे.

येणाऱ्या काळात कुस्तीची ही परंपरा जपली जावी यासाठी अशा स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन होणे गरजेचे आहे, असे उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळीग्रामस्थ, कार्यकर्ते व कुस्तीपटू उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande