आयओसीने आयओएसोबत ऑलिंपिक एकता कार्यक्रम केला पुन्हा सुरू
नवी दिल्ली, ०३ सप्टेंबर (हिं.स.)आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ऑलिंपिक एकता कार्यक्रमाअंतर्गत भारताला मिळणारा निधी थांबवल्यानंतर एक वर्षानंतर तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या समस्या सोडवण्यासाठी IOA च्या सुधारात्म
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन


नवी दिल्ली, ०३ सप्टेंबर (हिं.स.)आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ऑलिंपिक एकता कार्यक्रमाअंतर्गत भारताला मिळणारा निधी थांबवल्यानंतर एक वर्षानंतर तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या समस्या सोडवण्यासाठी IOA च्या सुधारात्मक उपाययोजना मान्य केल्या आहेत. आयओएच्या १२ कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी रघुराम अय्यर यांच्या उच्च पगाराचे कारण देत त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यास नकार दिल्याने, गेल्या वर्षी आयओसीच्या कार्यकारी मंडळाने खेळाडू विकास कार्यक्रमांसाठी दिले जाणारे १५ कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान थांबवले होते. पण क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्तक्षेपानंतर यावर्षी २४ जुलै रोजी आयओए अध्यक्ष पीटी उषा आणि बहुसंख्य बंडखोर कार्यकारी परिषदेच्या सदस्यांमध्ये तडजोड झाली. आयओए अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात आयओसीने संघटना आणि भारत सरकारने उचललेल्या सकारात्मक पावलांचे कौतुक केले आहे, ज्याचा उद्देश तळागाळापासून ते उच्चभ्रू पातळीपर्यंत खेळाडूंना सहकार्य आणि पाठिंबा देणे आहे. आयओसीने आयओएचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रघुराम अय्यर यांची औपचारिक नियुक्ती आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा स्वीकारणे हे भारतीय क्रीडा व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे मानले आहे. ऑलिंपिक एकता कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याने भारतातील खेळाडूंना थेट फायदा होईल. या उपक्रमामुळे खेळाडूंना ऑलिंपिक खेळांसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रशिक्षण, तयारी आणि सहभागासाठी थेट निधी आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतील. आयओए अध्यक्ष डॉ. पी.टी. उषा यांनी या घोषणेचे वर्णन भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण असे केले. त्या म्हणाल्या, हे नवीन आणि परिवर्तनकारी क्रीडा धोरणांतर्गत क्रीडा प्रशासनात सर्वोच्च मानके राखण्यासाठी आयओए आणि भारत सरकारच्या सामायिक संकल्पाचे प्रतिबिंब आहे. आयओसीसोबतची ही नवीन भागीदारी आपल्या खेळाडूंना त्यांची ऑलिंपिक स्वप्ने साकार करण्यात मोठी भूमिका बजावेल. भारतीय ऑलिंपिक संघटनेने आश्वासन दिले आहे की, ते भारतातील ऑलिंपिक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि खेळाडूंना सतत पाठिंबा देण्यासाठी आयओसीसोबत काम करत राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande