जमताराचा सायबर गुन्हेगार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात
सोलापूर, 3 सप्टेंबर (हिं.स.) : देशातील सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध झारखंड राज्यातील जमतारा येथील एका आरोपीला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने कर्नाटकच्या बंगळुरू येथून ताब्यात घेतले.सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश काशिनाथ पाट
जमताराचा सायबर गुन्हेगार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात


सोलापूर, 3 सप्टेंबर (हिं.स.) : देशातील सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध झारखंड राज्यातील जमतारा येथील एका आरोपीला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने कर्नाटकच्या बंगळुरू येथून ताब्यात घेतले.सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश काशिनाथ पाटील यांनी धूप स्टँडची ऑनलाईन ऑर्डर केली होती. धूप स्टँड डिलीव्हरीसाठी आला असता त्याने तुमचे पार्सल परत गेले असून ते घेण्यासाठी पाच रुपये अतिरिक्त चार्जेस लागतील त्यासाठी फोन पे करण्यास सांगितले. पाटील यांनी फोन पे केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून लगेच 90 हजार रुपये कट झाले. त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण सायबर सेलशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande